शिवजयंती निमित्त डोंबिवलीत साकारली शिवनेरीची प्रतिकृतीचा देखावा 

डोंबिवली : डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्यावतीने शिवजयंती निमित्ताने शिवनेरी किल्ल्याच्या प्रतिकृतीचा देखावा साकारण्यात आला होता. डोंबिवलीतील प्रसिध्द कलादिग्दर्शक उदय इंदप यांच्या संकल्पनेतून  हा देखावा साकारण्यात आलाय अवघ्या तीन दिवसात ही प्रतिकृती साकारण्यात आली असून हा देखावा पाहण्यासाठी  डोंबिवलीकरांनी गर्दी केली हेाती. डोंबिवली पूर्वेतील शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या बाहेर हा देखावा साकारण्यात आला होता.  शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला त्याच किल्ल्याचा एक भाग छोटयाशा जागेत आकर्षकपणे उभारण्यात आलाय. तसेच दोन तोफा व शिवकालीन मुद्रा हे सुध्दा एक आकर्षण ठरलं आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख व सभागृहनेता राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीत शिवजयंती उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *