उष्मा पेट्रोलपंपावर भेसळीचा आरोप, शिवसेनेचा ठिय्या आंदोलन

डोंबिवली :- येथील उष्मा पेट्रोल पंपात भेसळ केली जात असल्याचा आरोप करीत शिवेसेना शाखाप्रमुख संदीप नाईक यांनी आज पेट्रोल पंपावर ठिय्या आंदोलन केले. सदर पेट्रोल पंपावर कारवाई करावी अशा मागण्यांचे निवेदन त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दिलय. मात्र पेट्रोल पंप व्यवस्थापनाने अशी कोणतीही भेसळ होत नसल्याचे सांगितले.
शाखा प्रमुख नाईक यांनी सांगितले की, उष्मा पेट्रोलपंपात पाणी भेसळ केले जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने आज पेट्रोल पंपावर गेलो त्यांना एका बॉटलमध्ये पेट्रोलची मागणी केली त्यावेळी तेथील कर्मचा-यांनी उडवाउडवीची उत्तरे देत पेट्रोल देण्यास नकार दर्शविला. त्यामुळे आम्ही पेट्रोल पंपावरच ठियया आंदोलन सुरू केलं. याचवेळी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहन चालकांनीही आंदोलनात सहभाग घेतला. वातावरण चांगलेच तापल्यानंतर मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली संबधित पेट्रोल पंपावर गुन्हा दाखल करू असे आश्वास पोलिसांकडून दिल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!