बिल्डरांना न्याय, सामान्य जनतेवर अन्याय ..
कल्याण डोंबिवलीचा आवाज बना, सोशल मोहिमेत सहभागी व्हा !
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आकारण्यात येणारा ओपन लॅण्ड टॅक्स १०० टक्यांवरून कमी करून आता ३३ टक्के करण्यात आलाय. मात्र महापालिकेकडून सामान्यांसाठी आकारण्यात येणारा मालमत्ता कर हा सर्वाधिक ७३ टक्के आकारला जातो. ओपन लॅण्ड टॅक्स कमी करण्यात आला, मग मालमत्ता कर कमी का केला जात नाही. त्यामुळे मालमत्ता कर ही कमी झालाच पाहिजे. यासाठी सिटीझन जर्नलिस्टकडून सोशल मोहीम राबवली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत कल्याण डोंबिवलीकरांचा आवाज पोहचविला जाणार आहे.
मग विचार काय करता सोशल मोहिमेत सहभागी व्हा आणि कल्याण डोंबिवलीचा आवाज बना. आपली प्रतिक्रिया फोटोसह आम्हाला पाठवा. आमचा इमेल cjournalist4@gmail.com, वॉट्सअप नंबर 9821671737. facebook/citizenjournalist, twitter/@cjournalist4 वर follow आणि like करा.
सर्वाधिक कर असणारी महापालिका