तिकीट निरीक्षक त्याच्यासाठी देवदूत ठरला : कल्याण रेल्वे स्थानकातील थरार प्रकार 

कल्याण – सकाळी साडे नऊची वेळ, मुंबई लखनऊ पुष्पक एक्सप्रेसने कल्याण स्थानक सोडले. मात्र चालत्या गाडीत चढत असताना एक तरुण प्लेटफार्म व गाडीच्या मधे सापडला. इतक्यात मुख्य तिकीट निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता धाव घेत त्या तरुणाचा जीव वाचवला. चव्हाण हे त्याच्यासाठी देवदूतच ठरले. कल्याण रेल्वे स्थानकातील हा थरार प्रकार cctv मध्ये कैद झालाय. मुख्य तिकीट निरीक्षक शशिकांत चव्हाण हे अंबरनाथ मधील कांनसई  येथे राहत आहेत. आपल्या जीवाची बाजी लावत त्यांनी एका तरुणांचा जीव वाचवल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!