मंत्रालयासमोर वृध्द महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : मंत्रालयासमोर एका वृध्द महिलेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडलाय. सखूबाई विठ्ठल झाल्टे असे त्या महिलेचे नाव आहे. त्या महिलेने पोलिसांनी तातडीने सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये दाखल केलय.  सखुबाई विठ्ठल झाल्टे या 60 वर्षी असून, त्या नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव पंगु येथील राहणाऱ्या आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादासंदर्भात त्या मंत्रालयात फेऱ्या मारत होत्या. मात्र अधिका-यांकडून कोणतीच दाद मिळत नसल्याने त्यांनी मंत्रालयासमोरच विष प्राशन केल्याचे सांगितल जातय. मागील आठवडयात मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन हर्षल सुरेश रावते या तरूणाने उडी घेतली होती. तर ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन केले हेाते त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यु ओढावला होता. मंत्रालयातील आत्महत्येचे वाढते प्रकार रोखण्यासाठी खबरदारी म्हणून मंत्रालयात नायलॉनच्या जाळया बसविण्यात आल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *