शालेय बस चालकाकडून पालकावर जीवघेणा हल्ला, विद्याथ्याशी अश्लिल वर्तन केल्याचा विचारला जाब
बदलापूरमधील धक्कादायक प्रकार

बदलापूर : शाळेच्या बसचालकाकडून दुसरीत शिकणा-या विद्याथ्यांशी अश्लिल चाळे केल्याचा जाब विचारणा-या पालकाला बसचालकांनी जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार आज बदलापूर येथे घडला. या हल्ल्यात पालक मंगेश तारोळे- पाटील हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उल्हासनगरमधील सेंट्रल रूग्णालयात दाखल करण्यात आलय. या प्रकारामुळे पालकवर्गात संतापाची लाट उसळलीय.

बदलापूर येथे राहणारे मंगेश तारोळे- पाटील यांचा मुलगा लोकेश हा गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता २ रीत शिकत आहे. बसचालक रवी लवाटे हा लोकशबरोबर अश्लिल चाळे करणे तसेच डोळे वटारून धमकी देणे असे प्रकार करीत असत. सातत्याने हा प्रकार घडत असल्याने लोकेशने हा प्रकार पालकांना सांगितला होता. तसेच या भितीने तो शाळेत जाण्यासाठी घाबरत होता. पालक मंगेश पाटील यांनी या प्रकाराचा जाब विचारला असता बसमधील दुस- या चालकाने त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे पाटील यांनी बसचे मालक प्रसाद म्हस्कर यांच्याकडे त्या चालकाची तक्रार केली. बसमालकाकडे तक्रार केल्याने रागावलेल्या बस चालकांनी त्यांना जबर मारहाण करीत जीवघेणा हल्ला चढविला गंभीररित्या जखमी झालेले पालक मंगेश पाटील यांना उल्हासनगरमधील सेंट्रल रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बसचे मालक हा शिवसेनेचा पदाधिकारी असल्याने विद्याथ्यांच्या कुटूंबावर दबाव टाकला जात आहे अशी माहिती पाटील कुटूंबियांकडून सांगण्यात आली. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.

4 thoughts on “शालेय बस चालकाकडून पालकावर जीवघेणा हल्ला, विद्याथ्याशी अश्लिल वर्तन केल्याचा विचारला जाब : बदलापूरमधील धक्कादायक प्रकार”
  1. Very bad news and bus driver harishment from student. School staff and reputation not good with respect to school fees.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *