महागाई विरोधात काँग्रेसचा कल्याण तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

कल्याण : वाढत्या महागाई विरोधात आज कल्याण काँग्रेसच्यावतीने कलयाण तहसीलइदारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा कल्याण पश्चिमे कडील सहजानंद चौक ते कल्याण तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार विरोधात काँग्रेसने घोषणाबाजी केली, यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश प्रवक्ते ब्रिज दत्त आदी पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रोजच्या रोज पेट्रोल डिझेलच्या दरात भरसाठ वाढ होत आहे. तब्बल १९ वेळा घरगुती गॅसच्या किमतीत केलेली वाढ करण्यात आलीय त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे असह्य झाले आहे. कर्ज बाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत आहेत त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आमदार दत्त यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *