धर्मा पाटील यांची मृत्युशी झुंज अखेर संपली 
मुंबई : मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे धुळे जिल्ह्यातील ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांची मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. जे जे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
संपादित जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी मंत्रालय दरबारी धर्मा पाटील यांनी अनेक वेळा चपला झिजवल्या. त्यामुळे कंटाळलेलता पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालतात विष प्राशन केले होते. त्या दिवसापासून त्यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.
.….तर मृतदेह स्वीकारणार नाही
जमिनीचा योग्य तो मोबदला आणि धर्मा पाटील यांना शहीद  भूमिपुत्र शेतकरी चा दर्जा देण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत वडिलांचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका तटाचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी घेतलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *