डोंबिवलीकरांसाठी कायमस्वरूपी आधार केंद्र
राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
डोंबिवली : डोंबिवलीकरांसाठी कायमस्वरूपी आधार केंद्र सुरू होत आहे. महापालिकेच्या डोंबिवली पूर्वेतील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात २४ जानेवारी पासून हे केंद्र सुरू होणार असून, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता आधार केंद्राचे उद्घाटन होणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून आधार केंद्र बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना नवीन आधार कार्ड काढण्यासाठी तसेच नाव़, पत्ता, मोबाईल नंबर बदलण्यासाठी खूपच अडचणीचे ठरत आहेत. डोंबिवलीचे आमदार व राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवली महापालिकेच्या विभागीय कार्यालयात आधार केंद्र सुरू करण्यात येत आहे. हे केंद्र कायमस्वरूपी असणार आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांना खूपच सोयीचे ठरणार आहे. तरी डोंबिवलीकरांनी आधार केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन चव्हाण यांनी केलय.
Very good step taken thanks a lot. Pl let me know the timing and contact no.