भाजप नगरसेवक महेश पाटील पोलिसांच्या ताब्यात

डोंबिवली : येथील भाजपचे पुरस्कत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणात भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांना आज ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. काही दिवसांपूर्वी भिवंडी-वाडा परिसरात व्यापाऱयांना लुटणारी टोळी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने गजाआड केली होती. पोलिसांनी हल्लेखोरांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी नगरसेवक कुणाल पाटील यांना ठार मारण्यासाठी भाजप नगरसेवक महेश पाटील यांनी एक कोटीची सुपारी दिल्याची कबुली पोलिसांकउे केली होती त्यानुसारच महेश पाटील यांच्यासह अन्य दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने महेश पाटील याचा अटकपूर्व जामीनही फेटाळला होता. त्यामुळे कोणत्याही क्षणी महेश पाटील याला पोलीस ताब्यात घेतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आज नगरसेवक पाटील आणि अन्य दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!