डोंबिवली पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर 

अध्यक्षपदी प्रथमच महिला पत्रकाराचा सन्मान 

डोंबिवली – डोंबिवलीत सर्वात जुना व विश्वास संपादन केलेल्या डोंबिवली पत्रकार संघाची बुधवारी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी पत्रकार संघाची सन २०१८-१९ ची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला पत्रकार  जान्हवी मोर्ये (लोकमत) यांची निवड करण्यात आली. तर कार्याध्यक्षपदी श्रीराम कादु (वृत्तमानस), उपाध्यक्षपदी शंकर जाधव (नवशक्ती ,सागर), सचिवपदी मुरलीधर भवार (लोकमत) व खजिनदारपदी  प्रशांत जोशी (ठाणे वैभव ,नवराष्ट्र) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या सभेत मावळते अध्यक्ष आकाश गायकवाड यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. डोंबिवलीतील विविध प्रश्न व सामाजिक ,सांस्कृतिक , शैक्षणिक प्रश्न एकजुटीने सोडवणे तसेच पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचा मनोदय  यावेळी बोलताना अध्यक्ष जान्हवी मोर्ये यांनी व्यक्त केला. उपााध्यक्ष शंकर जाधव म्हणाले की,  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अंध विध्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून त्याला प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे त्यामुळे या कामात पत्रकार संघटनांनी पुढाकार घ्यावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तर कार्याध्यक्ष श्रीराम कांदू यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे वार्तालापाचे कार्यक्रम राबवून त्यातून अनेक प्रश्न सोडविण्याचा मानस व्यक्त करीत, पत्रकारांच्या हितासाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याचेही सांगितले.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!