सिव्हिल हॉस्पिटलमधून बाळ चोरणा-या महिलेला डोंबिवलीतून अटक
ठाण : येथील सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेल्या बाळाचा अवघ्या २४ तासात शोध लावून त्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केलीय. मुलं चोरणा-या या महिलेला डोंबिवलीच्या पिसवली परिसरातून अटक केली असून तिच्या घरात आणखी तीन मुलं आढळून आलीय. याप्रकरणी पोलिसांनी गुडीया सोनू राजभर, सोनू परशुराम राजभर, विजय श्रीवास्तव या तिघांना अटक केलीय. रविवारी ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसूती कक्षातून पाच तासांच्या बाळाचं अपहरण झालं होत. एक महिला बाळाला पळवून नेताना सीसीटीव्हीत कैदही झाली होती. त्याच आधारे पोलिसांनी तपास करून अवघ्या काही तासात हे यश मिळवलं अशी माहिती ठाणे पोलिस सहआयुक्त मधुकर पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भिवंडी येथील मोहिनी मोहन भुवर याचं हे बाळ आहे. बाळ त्याच्या आईकडे सोपवण्यात आले असले तरी रूग्णालयातील सुरक्षचा प्रश्न ऐरणीवर आलाय.