पंतनगर पोलीस चौकीचे टाळं कधी उघडणार 

 रेल्वेच्या परिसरात नेहमी लाखो प्रवाशांची वर्दळ असते . या वर्दळीमध्ये कोणतीही घटना कधीही घडू शकते या घडणाऱ्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि प्रवाशी व सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मुंबईत महत्वाच्या स्थानकावर बिट बांधण्यात येतात . घाटकोपर पूर्वेतील पंतनगर पोलीस ठाण्याचे बिट क्रमांक 2 सध्या बंद अवस्थेत म्हणजे या बिटला टाळे लावलेले दिसते . या बिटच्या बाहेर फलक चिकटवण्यात आले आहे . प्रवाशी अथवा नागरिकांना  ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी भाडे नाकारत असेल तर सदर पोलीस बिट मध्ये त्याची तक्रार डायरी ठेवण्यात आली आहे . प्रवाशी , नागरिक या बिट मध्ये येऊन आपली तक्रार नोंद करू शकतात मात्र सदरील बिट बंद असल्याने प्रवाशांनी तक्रार कुठे करायची असा प्रश्न प्रवाशी व नागरिकांना पडला आहे . त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी सदरील बिट 24 तास चालू व पोलीस अधिकारी बिट मध्ये असावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.( फोटो : निलेश मोरे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *