शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची हत्या खंडणीसाठीच ?

मुंबई : कांदिवली येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची निर्घण हत्या करण्यात आलीय. रात्रीच्या सुमारास सावंत हे घरी जात असतानाच बाईकवरून आलेल्या काही अज्ञातांनी त्यांच्यावर धारदासर शस्त्राने हल्ला केला. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यता आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल. घरापासून अवघ्या काही अंतरावरच सावंत यांच्यावर हल्ला करण्यात आलाय. सावंत यांनी काही वर्षांपूर्वी केबलचा व्यवसाय सुरू केला होता. गेल्या काही दिवसांपासून खंडणीसाठी धमक्यांचे फोन येत असल्याची तक्रारही त्यांनी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. त्यामुळे खंडणीसाठी त्यांची हत्या झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हत्येचं नेमकं कारण  स्पष्ट होऊ शकल नसून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.  तसेच ज्या ठिकाणी हत्या झाली त्या परिसरातील एखादं सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचाही प्रयत्न करत आहेत. भररस्त्यात सावंत यांची हत्या करण्यात आल्यानं संपूर्ण परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे.  पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *