शरद पवारांबद्दल सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट : पोलीस तक्रार दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या विषयीची आक्षेपाई पोस्ट सोशल मिडीयावर पोस्ट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. फेसबूकवर आलेल्या आक्षेपाई पोस्टबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलीसात  तक्रारही दाखल केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने हितचिंतकाने फेसबुक अकांऊंटवर ही पोस्ट टाकण्यात आलीय याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलीय.
देशाच्या व राज्याच्या विकासात योगदान असलेल्या शरद पवार साहेबांबद्दल अशा प्रकारे पोस्ट टाकून बदनामी केल्याने त्या मनोवृत्तीच्या माणसाचा आम्ही धिक्कार करीत असल्याचा तटकरे म्हणाले. पक्षाच्या वतीने या वृत्तीविरोधात कडक पावले उचलली जाणार असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुरू असणाऱ्या अकाऊंटवरून चालणाऱ्या या प्रकाराला मुख्यमंत्र्यांची संमतीआहे का ? असा सवाल विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांची या प्रकाराला संमती नसेल तर या अकाऊंट चालवणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!