रेल्वे रूळात लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेने जीव गमावला

कल्याण : रेल्वे रूळावर लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेला लोकलची धडक बसून मृत्यू झाल्याची र्दुदैवी घटना पहाटेच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकात घडलीय. सीताबाई सोळंके असे मृत् महिलेच नाव असून त्या परभणीच्या रहिवाशी होत्या.  मुंबईत मुलीच्या उपचारासाठी मंगळवारी देवगिरी एक्सप्रेसने नातेवाईकांसोबत आल्या हेात्या.कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर गाडी थांबल्यानंतर त्या लघुशंकेला जाण्यासाठी डब्यातल्या प्रसाधनगगृहाजवळ आल्या, मात्र तिथे गर्दी असल्यानं त्या खाली उतरल्या आणि थेट प्लॅटफॉर्म क्रमांक ४ च्या रेल्वे रुळात लघुशंकेसाठी उतरल्या. त्याचवेळी ६ वाजून २३ मिनिटांची बदलापूर लोकल कल्याण स्थानकात येत असतानाच, या लोकलची धडक बसून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे रेल्वेचा तासभर खोळंबा झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *