बाळासाहेबांच्या जीवनावरील ‘ठाकरे’ चित्रपटाच टीझर लाँच : २३ जानेवारी २०१९ ला होणार रिलीज
मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ या सिनेमाच्या टीझर आणि पोस्टरचं लाँचिंग करण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत लाँचिंग पार पडलं. हा सिनेमा 23 जानेवारी 2019 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर, मनसे नेते अभिजीत पानसे दिग्दर्शन करणार आहेत. यावेळी बोलताना बिग बी अमिताभ बच्चन म्हणाले की, बाळासाहेब हे मला वडीलांसमान होते. त्यांच्यासोबत माझ कौटूंबिक नातं होत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ‘ कुलीच्या वेळी मला बेशुद्ध अवस्थेत बंगलोरहून मुंबईला आणलं. खूप पाऊस होता. मला विमानतळाहून थेट हाॅस्पिटलला न्यायचं होतं. मुंबईत एकही अँब्युलन्स उपलब्ध नव्हती. फक्त बाळासाहेबांच्या शिवसेनेची अँब्युलन्स मदतीला आली. नाहीतर माझी अवस्था जास्त गंभीर झाली असती असेही ते म्हणाले.हा सिनेमा फक्त तीन तासापुरता मर्यादित ठेऊ नका. या सिनेमाचे अनेक भाग यावेत अशी माझी इच्छा आहे. कारण की, फक्त तीन तासात बाळासाहेब समजून घेता येणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर एखादी वेब सीरीज तयार व्हावी अशी माझी इच्छा आहे असे बिग बी म्हणाले.