घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट एकजण जखमी 

भिवंडी : शहरातील अंबिकानगर येथील एका चाळीतील स्वयंपाक घरात गॅस सिलेंडरच्या टाकीला गळती होवून स्फोट झाल्याने घरमालक गंभीर जखमी झाल्याची घटना  घडलीय.  धर्मराज महादेव सिंग (२५ ) असे जखमी इसमाचे नाव आहे. जखमीवर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.या या स्फोटाची निजामपुरा पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. धर्मराज हा रात्री अंबिकानगर येथील आपल्या राहत्या घरात स्वयंपाक करत असताना अचानपणे गॅस सिलेंडरच्या टाकीचा स्फोट झाल्याने धर्मराज गंभीररीत्या भाजलाय .सिलेंडरच्या स्फोटामुळे घरात आग लागली व  छताचे पत्रे फुटून सर्वत्र विखुरले. गॅस सिलेंडरच्या स्फोटाचा आवाज होताच चाळीतील रहिवाशांनी घाबरून आपल्या राहत्या घरातून पळ काढला. या स्फोटाची माहिती  पालिकेच्या अग्निशमन दलास मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेवून आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले. घटनेची माहिती मिळताच महापौर जावेद दळवी,माजी नगरसेवक प्रदिप राका यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *