नागपूर जिल्हा परिषद अँप चा मुख्यमंत्रयाच्या हस्ते शुभारंभ
नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेने तयार केलेल्या माता बाल संगोपन ई फाईल आणि नागरी सुविधा अॅपचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रेशखर बावनकुळे उपस्थित होते. मुख्यमंत्रयानी आज एका बैठकीत नागपूर जिल्ह्यातील विविध प्रकल्प आणि प्रश्नांचा आढावा घेतला. यात अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प, नाग नदी स्वच्छता मोहीम, जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह विविध रस्त्यांची कामे, सर्वासाठी घरे आणि इतर विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यानंतर विधानभवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गव्हर्नमेन्ट स्टाफ रिकरूटमेंट साठी महापरिक्षा पोर्टलचे उदघाटन करण्यात आले.
