देवा आणि गच्चीला प्राईम टाईम न मिळाल्यास खळखटयाक : महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचा इशारा

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमामुळे मराठी चित्रपट देवा आणि गच्ची यां सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नसल्याने मनसे आता आक्रमक झाली आहे. मराठी सिनेमाला प्राईम टाईम न मिळाल्यास खळखटयाक करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. जे थिएटर मालक मराठी सिनेमाला प्राइम टाइममध्ये शो देणार नाहीत, त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणीही खोपकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

येत्या शुक्रवारी ‘गच्ची’ आणि ‘देवा’ हे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यांच्यासमोर सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’. हा हिंदीत बिग बजेट सिनेमा येत आहे. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे प्रत्येक स्क्रिनवर 5 खेळ लावा, असा मेल यशराज फिल्म्सने सर्व थिएटर मालकांना केला आहे. त्यामुळे देवा आणि गच्ची सारख्या मराठी चित्रपटांना थिएटर न मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यामुळेच मनसे आक्रमक झालीय.

खोपकर म्हणाले की, महाराष्ट्रात प्राइम टाइममध्ये मराठी सिनेमाला स्क्रिन मागावी लागते हे दुर्देव आहे. मराठी सिनेमाला स्क्रिन देण्याचा कायदाच आहे. तो आमचा हक्कच आहे. त्यामुळे थिएटर मालकांनी आम्हाला स्क्रिन द्यावी अन्यथा पुढे होणाऱ्या परिणामाला सामोरे जावं लागेल. यशराज फिल्म्सच्या सिनेमांची शूटिंग महाराष्ट्रातही होते, हे त्यांनी लक्षात ठेवावं. मुजोरी खपवून घेणार नाही, असा सज्जड दम खोपकर यांनी दिलाय. दरम्यान मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनीही प्राईम टाईम मध्ये देवा हा मराठी चित्रपट जर सिनेमागृहात दाखवला जाणार नसेल तर महाराष्ट्रात टायगर जिंदा है हा हिंदी चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही इशारा इशारा सिनेमागृह मालकांना दिलाय.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!