डोंबिवलीतील नगरसेवकाला ठार मारण्यासाठी १ कोटीची सुपारी

डोंबिवली : डोंबिवलीतील भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना ठार मारण्यसाठी  १ कोटी रूपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब उजेडात आलीय. भिवंडीतील दरोडा पकडण्यात आलेल्या आरोपींनीच पोलिसांना ही कबुली दिली असून त्यासाठी ११ लाख रूपये अॅडव्हान्स घेतल्याचेही सांगितले आहे. डोंबिवलीतील एका नगरसेवकाने ही सुपारी दिल्याची माहिती त्या आरोपींनी दिलीय  मात्र त्या   नगरसेवकाचे नाव पोलिसांनी उघड केललं नाही मात्र त्या नगरसेवकाला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
भिवंडी वाडा रोडवरील सशस्त्र दरोडा प्रकरणात ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहा जणांना अटक केलीय. त्यांच्याकडून त्यांच्याकडून १ पिस्तुल, १ रिव्हॉल्व्हर, २ गावठी कट्टे, १६ जिवंत काडतुसं यासह ३ लाख ४० हजार रुपये रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केलीय. त्याचवेळी या आरोपींनी ही कबुली दिल्याने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!