व्हिक्टरी ज्युदो क्लबच्या  8 सुवर्णपदक विजेत्यांची  राज्य स्पर्धेसाठी निवड
डोंबिवली :  ठाणे जिल्हा कॅडेट व ज्यनियर जुदो   स्पर्धेत  डोंबिवलीच्या व्हिक्टरी ज्युदो क्लबच्या  ८ ज्युदोकांनी आपापल्या वजनगटात सुवर्ण पदक पटकावून राज्य स्पर्धेसाठी  निवड झालीय . तर २ खेळाडूंनी रजत पदक मिळविले. राज्य ज्युडो स्पर्धा १५ ते १७ डिसेंबर दरम्यान स्व. मीनाताई ठाकरे  विभागीय  क्रिडा संकुल, नाशिक  येथे होणार आहे.
व्हिक्टरी ज्युदो क्लबच्या मानसी विष्णू मोरे, अमृता दिलीप गुप्ता, प्रांजल पुष्कर पुराणिक,  हर्ष बाळू फापाळे, शब्बीर लक्कडघाट, नील मॅथ्यू, जनक ढोकरट, हर्ष गाला यांनी सुवर्ण पदक पटकावत राज्य स्पर्धेसाठी निवड झालीय. तर  आर्यन विजय म्हात्रे, अक्षय बाबासाहेब पवार  यांनी रजतपद पटकावले.
ठाणे जिल्हा कॅडेट व ज्यनियर ज्युदो  स्पर्धा व राज्य निवड चाचणी शनिवारी कल्याणात पार पडली.  १४ ते १६ वर्षे (कॅडेट गट) व १७ ते २० वर्षे (ज्युनीयर गट) या गटांसाठी झालेल्या या स्पर्धेत ८ खेळाडूनी सुवर्ण पदक पटकावून राज्य स्पर्धेत आपली निवड पक्की केलीय. के.ए.मॅथ्यू व लीना ओक मॅथ्यू संचालित व्हिक्टरी ज्युदो क्लबचे ज्युदो कोच पूर्वा मॅथ्यू व आशुतोष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युदोकांनी हे यश मिळविले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *