कल्याणात वृध्दांची सुरक्षितता धोक्यात ; रिक्षावाल्याने दोन वृध्दांना भरदिवसा लुटले 

शिवाजी चौकात दोघांना लुटतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

कल्याण :  वृद्धांना बोलण्यात गुंतवून त्यांना लुटणारा रिक्षावाला कल्याण शहरात सध्या धुमाकूळ घालतोय. त्याने नुकतंच कल्याणच्या गजबजलेल्या शिवाजी चौकात दोन वृद्धांना लुटलं असून हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. त्यामुळे या रिक्षावाल्याला पकडण्याचे आव्हान कल्याण पोलिसापुढं आहे. लुटल्या गेलेल्यांमध्ये कल्याणचे ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर यांचाही समावेश आहे. मात्र यानिमित्तानं वृद्ध नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आलीये.

पत्रकार अण्णा बेटावदकर हे  महापालिकेकडील रस्त्यावरून शिवाजी चौकाकडे पायी जात असताना अचानक त्यांना एका रिक्षाचालकानं हात धरून थांबवलं आणि त्यांच्याशी बोलू लागला. यानंतर बोलता बोलता अचानक त्याने त्यांच्या खिशातला मोबाईल काढला आणि पोबारा केला. हा प्रकार लक्षात येताच अण्णा बेटावदकर माघारी फिरले, पण रिक्षावाला पळून गेला होता. दरम्यान, त्याने अण्णा बेटावदकर यांच्या आधी तिथेच आणखी एका वृद्धालाही लुटलं असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या चोरट्या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.

पहा व्हिडीओ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *