डोंबिवलीत मनसेच्या करिअर मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद : ७०० तरुणांनी घेतला सहभाग 

डोंबिवली :   महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि यश मंत्र करिअर अकादमी मार्फत विविध सरकारी आस्थापना आणि कार्यालयांमधे २३०० जागांच्या येऊ घातलेल्या भरतीसंदर्भात मार्गदर्शन शिबीर रविवारी बालभवन डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी डोंबिवली आणि मुंबई  परिसरातील सुमारे ७०० तरुणांनी सहभागी होऊन उस्फुर्त प्रतिसाद दिला

या कार्यक्रमात यश मंत्र अकादमीचे संचालक कुलकर्णी सर आणि .धुरी सर ह्यांनी मार्गदर्शन केले. त्याबरोबरच विद्यार्थी सेना डोंबिवली शहर अध्यक्ष सागर रविन्द्र जेधे,मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम,उपजिल्हाध्यक्ष सुदेश चुडनाईक,विरोधी पक्षनेते मंदार हळबे  यांच्यासह विद्यार्थी सेना आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *