विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

डोंबिवली : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचदृष्टीन डोंबिवलीतील जनहित प्रतिष्ठानने मुलूंड येथील प्लॅटिनम हॉस्पिटलच्या सहकार्याने डोबिवली पूर्वेतील सावरकर रोड परिसरातील आंबेडकर वसाहतीत विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केल होत. या शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभाला. सुमारे ७० जणांनी शिबीराचा लाभ घेतला.  शिबीरात ईसीजी, ब्लड शुगर एन्जीयोप्लास्टी बायपास सर्जरी आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आदी विनामूल्य पार पडले. शिबीराला स्थानिक रहिवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्थानिक नगरसेवक संदीप पुराणिक आणि कैलास डोंगरे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने शिबीर यशस्वीरित्या पार पडले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!