एका इसमावर तलवारीने वार : राजकीय वादातून हल्लाचा संशय ? 

वासिंद ( प्रतिनिधी )- येथील कोसले गावात राहणाऱ्या एका इसमावर तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केले असुन या घटनेमुळे या परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

आज सकाळी 10 च्या सुमारास कोसले गावातील संतोष कोळेकर हे वासिंद पुर्वेकडील रेल्वे स्थानक लगत उभे असताना यावेळी याच गावामधील तरुण बाळाराम दळवी यांने बेसावध असलेल्या कोळेकर यांच्यावर तळवारीने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. यावेळी या घटनेची माहिती एका महिलेने पोलिसांना सांगितले असता वासिंद पो. स्थानकातील पो.ह. शेट्ये, साबळे, वाघमारे, सागळे, मोरे, पाथर्वडे, कोळी, पटेकर, महिला पोलीस मोहपे, गारे, चळवादी या कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व आरोपीला पकडुन जेरबंद केले. सदर, संतोष कोळेकर यांच्या तोंडावर, हातावर, अनेक वार झाले असुन रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचार नंतर पुढील उपचार्थ त्यांना तात्काळ कल्याण येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. सदरचा हा हल्ला राजकीय अथवा वैयक्तिक वादातून झाला आहे का या दिशेने तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक जी.जे वळवी यांनी म्हटले. दरम्यान , एकीकडे ऐन निवडणूकीचे वातावरण रंगात असताना हि घटना घडल्या मुळे वासिंद शहर व परिसरात तणावाचे तर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!