पारसिक बोगदयानजीक मालगाडीचा डब्बा घसरला, मरेची वाहतूक विस्कळीत

ठाणे : मध्य रेल्वे मार्गावर दिवा आणि ठाणे स्थानकादरम्यान पारसिक बोगद्याजवळ मालगाडीचा डबा घसरला. त्यामुळे मुंबईकडे येणारी जलद गतीची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेमुळे जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे धीम्या मार्गावर १० ते १५ मिनिटे उशीराने लोकल धावत आहेत. या अपघातामुळे संध्याकाळी कामावरून घरी परतणा-या चाकरमण्यांचा खोळंबा झाला. डब्याचे कपलिंग तुटल्याने ही रूळावरून घसरल्याचे सांगितले जात आहे. लोकलसह काही लांब पल्ल्याच्या गाड्याही अपघातामुळे रखडल्या आहेत. घटनास्थळी रेल्वेचे तंत्रज्ञ पोहोचले आहेत. मदतकार्य सुरू आहे. घसरलेला डबा हटवून वाहतूक लवकरच सुरळीत केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *