डोंबिवली, १६ मे: ज्येष्ठ पत्रकार सुरेश गायकवाड यांच्या मातोश्री राजूबाई रामचंद्र गायकवाड (वय ८७) यांचे १५ मे २०२५ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डोंबिवलीतील शिव मंदिर मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
राजूबाई गायकवाड या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील ओवळे या मूळ गावातील असून, त्या शेतकरी कुटुंबातून होत्या. आपल्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून काम करत त्यांनी पाचही मुलांना उच्च शिक्षणाची संधी दिली. नोकरीच्या निमित्ताने त्यांनी डोंबिवलीत स्थायिक होत आपल्या कुटुंबाचे उत्तम पालनपोषण केले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दहावा कार्यक्रम
२४ मे रोजी खिडकाळी, कल्याण-शिळ रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.
तेरावा कार्यक्रम
२७ मे रोजी “शिवस्मृती हॉल सोसायटी”, गिरनार शेजारी, आर. पी. रोड, डोंबिवली (पूर्व) येथे पार पडणार आहे.
