पेट्रोलमध्ये भेसळ करणाऱ्या पेट्रोलपंप चालकाला ‘मनसेचा’ हिसका

कल्याण :-  येथील आग्रारोड वरील पेट्रोलपंपावर भेसळयुक्त पेट्रोल विक्री होत असल्याने शुक्रवारी  मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह  मनसैनिकांनी पेट्रोल पंपावर धाव घेऊन, पेट्रोल पंप चालकाला जाब विचारला. मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मनसेच्या आक्रमक पावित्र्यानंतर  हा पेट्रोल पंप दुपारपासून बंद करून, पेट्रोलचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेेेत

कल्याण पश्चीमेकडील आग्रारोडवर अनुष्का या नावाचा पेट्रोलपंप आहे. या पंपावर गेली दोन ते तीन दिवसापासून भेसळयुक्त पेट्रोल दुचाकीमध्ये भरत असल्याच्या तक्रारी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांना मिळाली होती. यामुळे त्यांनी पंपावर कार्यकत्यांसह शुक्रवारी दुपारच्या सुमाराला धाव घेत जाब विचारला. मात्र पंपावरील मुजोर कामगारांमुळे हा वाद अधिक चिघळला. त्यामुळे बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल होवून परिस्थिती नियंत्रणात आणली. आज सुट्टीचा दिवस असल्याने शासकीय कार्यलय बंद आहे. यामुळे या घटनेची स्टेशन डायरीत नोंद करण्यात आल्याचे बाजारपेठ पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. तसेच ताब्यात घेतलेले पेट्रोल उद्या तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात येणार असून तपासणीचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.  दरम्यान ठाणे जिल्ह्यातील पेट्रोलपंपावर पेट्रोलमध्ये मापात पाप करणाऱ्या चालकांचा भांडाफोड काही महिन्यापूर्वीच ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *