युवक काँग्रेसकडून राज ठाकरेंच्या पोस्टरची होळी

घाटकोपर ( निलेश मोरे ) : मुबई काँग्रेस कार्यालयाची मनसेकडून तोडफोड केल्याच्या निषेधार्थ  मुंबई युवक काँग्रेसने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पोस्टरची होळी केली. मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सूरज सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकत्यांनी मनसे विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत राज ठाकरे यांचे पोस्टर जाळले. मनसैनिकांनी लपून छपून कार्यालयाची तोडफोड केलीय त्यामुळे राज ठाकरेंना बांगडया पाठविणार असल्याची जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. त्यामुळे आता मनसे विरूध्द काँग्रेस असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *