राजेश मोरे, रमाकांत मढवी यांच्यानंतर आता शिवसेनेचे उत्तर भारतीय नेता विश्वनाथ दुबे इच्छूक

कल्याण : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात हिंदी भाषिक समाजाने एकत्र येत उमेदवारीवर दावा केला आहे. डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे आणि शिवसेनेचे पदाधिकारी रमाकांत मढवी यांच्यानंतर आता शिवसेनेचे उत्तर भारतीय नेता विश्वनाथ दुबे यांनीही कल्याण ग्रामीण मतदारसंघात निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली आहे.

विश्वनाथ दुबे हे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते असून, त्यांचा मुलगा सागर दुबे हाही युवा शिवसेनेत सक्रिय कार्यकर्ता आहे. कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील आहेत. आता या जागेसाठी शिवसेना शिंदे गटामध्ये उमेदवारीसाठी इच्छूकांची संख्या मोठी आहे. शिवसेनेचे उत्तर भारतीय नेते विश्वनाथ दुबे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघात निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. आता शिवसेनेचे वरिष्ठ नेते या मागणीवर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचे आहे. यावेळी उत्तर भारतीय समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *