उद्धव सेनेच्या मराठवाडा मधील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा डोंबिवलीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश
डोंबिवली: सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कामावरती विश्वास ठेवून हा प्रवेश केला असून आम्हाला त्यांच्या पारदर्शक कामाबद्दल प्रचंड आदर आहे. आम्ही त्यांचे काम पाहिले आहे. महाराष्ट्राला अशा नेत्याची गरज असून त्यांना पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. आम्हीही आता मराठवाडयामध्ये सिल्लोड, नांदेड, उस्मानाबाद आदी सर्व भागात पक्ष वाढी, बळकटीसाठी झटणार असल्याचे राजपूत समाजाचे मराठवाडा येथील नेते माधव सिंह राजपूत उर्फ, अशोक राठोड यांनी डोंबिवलीत व्यक्त केले.
बदनापूर विधानसभेचे भाजपचे आमदार नारायण कुचे, कल्याण जिल्हा सरचिटणीस १४४ कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर (नंदू) परब, दत्ता माळेकर यांच्या उपस्थितीत राजपूत समाजाच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. शुक्रवारी त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम डोंबिवली पूर्वेकडील ठाकूर हॉल सभागृहात संपन्न झाला. त्यामध्ये प्रामुख्याने अनिल राठोड रामेश्वर काळे, योगेश ठोंबरे समाधान वाघ लहू तिडके आदी कार्यकर्त्यांचा समवेश होता.