काँग्रेस चे नवीन सिंग निवडणूक लढवण्यास इच्छुक

कल्याण : कल्याणमध्ये दोन मतदारसंघात महाविकास आघाडीतील गटांमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. काँग्रेसने या मतदारसंघाबाबत स्पष्ट भूमिका घेतली असून जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यानंतर आता काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा काँग्रेस प्रदेश कमिटी नागरी विकास सेलचे अध्यक्ष नवीन सिंग यांनी सुद्धा कल्याण पुर्व पश्चिम मतदार संघात निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कल्याण पुर्व मतदार संघात ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांची कमतरता आहे, त्यामुळे त्यांना बाहेरून उमेदवार आणावा लागेल, किंवा त्यानं उमेदवार आयात करावा लागेल. काँग्रेसकडे या जागेसाठी आपल्या रूपाने सक्षम उमेदवार असल्याचा दावा नवीन सिंग कडून करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकटे लढण्याची वेळ आली तर ही जागा काँग्रेस लढवणार अशी माहिती काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *