डोंबिवली, दि.२१ : बदलापूर येथील दोन चिमुरड्यांवर झालेल्या  लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसात राज्यभर उमटले आहे. डोंबिवलीतही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने काळ्या फिती लावून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करीत जाहीर निषेध केला.  

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डोंबिवली शहर शाखेच्या वतीने बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात शिवसैनिकांनी  जोरदार आंदोलन केले.’बदलापूर अत्याचार’ घटनेचा निषेध व्यक्त संतप्त शिवसैनिकांनी हाताला काळा किती बांधून राज्य सरकारचा जाहीर निषेध केला.  आरोपीला फाशी झालीच पाहिजे, थापांचे झाले थरावर थर, महिला सुरक्षा वाऱ्यावर…., लाडकी बहिण नको सुरक्षित बहिण योजना हवी,राज्यसरकारचा जाहीर निषेध ! ,घाणेरड्या राजकारणात व्यस्त असलेल्या व प्रशासनावर जरब नसलेल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या ! अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली . 

 .या आंदोलनात कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ जिल्हा संघटिका वैशाली दरेकर-राणे ,उपजिल्हाप्रमुख तात्या माने , विधानसभा संपर्कप्रमुख अरविंद बिरमोळे ,शहर संघटक मंगला सुळे शहरप्रमुख अभिजित सावंत आणि प्रकाश तेलगोटे सह उपशहर संघटक,विभागप्रमुख,विभागसंघटक ,शाखाप्रमुख ,शाखासंघटक, उपशाखप्रमुख आणि गटप्रमुख सहभागी झाले आहेत.तर बदलापूर रेल्वे स्थानकातील नागरिकांचे आक्रोश पाहता आज डोंबिवलीत आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *