उध्दव ठाकरेंच्या सर्व कुंडल्या माझयाकडे
नारायण राणेंचा इशारा
डोंबिवली : बाळासाहेबांना जेवढा त्रास उद्धव ठाकरेंनी दिला तेवढा कोणत्याच मुलानं आपल्या बापाला दिला नसेल. मी याला साक्षीदार आहेत. उद्धव ठाकरेंच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे आहेत.’ असा इशारा काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी डोंबिवलीत कार्यकर्ता मेळाव्यात दिला.1 तारखेला दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेऊन पुढची दिशा स्पष्ट करणार असल्याचेही राणेंनी सांगितले.
काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे हे भाजपच्या वाटयावर आहेत मात्र त्यांना भाजपमध्ये घेऊ नये यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच राणे यांनी उध्दव ठाकरेंना हा इशारा दिला. मी अमूक एक पक्षात जाऊ नये यासाठी उध्दव ठाकरे प्रयत्न करीत आहेत. राणेंना सत्तेत घेऊन नका यांनी बाळासाहेबांना त्रास दिला. पण आज मी उघडपणे सांगतो. बाळासाहेबांना जेवढा त्रास उद्धव ठाकरेंनी दिला तेवढा कोणत्याच मुलानं आपल्या बापाला दिला नसेल. याचा मी साक्षीदार आहे. उध्दव ठाकरे तू जेवढ माझयावर टीका करशील त्याच्या १० पटीत माझयाकडे कुंडल्या आहेत. बोलायला लावू नका. बोललो ना, पळता भू थोडी होईल असा इशाराच राणेंनी दिला. त्यामुळे राणेंच्या टीकेला शिवसेना काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.