डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील शास्त्रीनगर परिसरात असलेल्या ब्ल्यू डायमंड सोसायटीतील दोन घरे फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्कम असा तब्बल 9 लाख 44 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेला 3 दिवस उलटूनही अद्याप चोरटे हाती लागले नसल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या संदर्भात ब्ल्यू डायमंड सोसायटीतील बी/005 मध्ये राहणारे सुरेंद्र दौलतराव शिंदे (54) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 10.40 ते 11.15 च्या दरम्यान दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दोन्ही दरवाजे हत्यारांच्या साह्याने उचकटून त्यातील सोन्याचे दागिने आणि 15 हजारांची नोकरी असा 9 लाख 44 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. त्याचवेळी शिंदे कुटुंबियांच्या घरासमोर राहणारे जयेश शिवराम कदम (33) यांच्या देखील दरवाज्याचे लॉक तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून देवघरात ठेवलेली कर्णफुले आणि काही रोकड चोरून नेली. पोलिसांनी या दोन्ही घरफोड्यांच्या प्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेला 3 दिवस उलटूनही अद्याप चोरटे हाती लागले नसल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

****”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!