डोंबिवली : गेल्या चार वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या मॅफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्सचा तस्कराला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी मोठ्या कौशल्याने जेरबंद करून गजाआड केले आहे. सैफ सिकंदर बुरहान (38, रा. गुलमोहर अपार्टमेंट, राबोडी, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून कल्याण कोर्टाने अधिक चौकशीसाठी त्याला पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, बाजारपेठ पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8 (क), 21(क), व 29 (नार्कोटिक्स) या गुन्ह्यातील मागील चार वर्षांपासून फरार असलेला सैफ बुरहान हा कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ येणार असल्याची माहिती खासगी गुप्तहेरांकडून हवालदार सचिन साळवी यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनिरीक्षक नवनाथ रूपवते, जमादार सुरेश पाटील, सचिन साळवी, प्रेम बागुल, अरुण आंधळे या पथकाने सैफ बुरहन याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी अधिक तपास सपोनि नवनाथ रूपवते करत आहेत.
*****