पुणे: ट्रेनी आयएएस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपुर्वी मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पूजा खेडकर यांच्या नियुक्तीचे  प्रकरण खूपच गाजत आहे. यामध्ये वेगवेगळी माहिती उजेडात येत आहे. मनोरमा खेडकर यांचं नवीन प्रकरण बाहेर आल्यानंतर अनेक दिवसांपासून मनोरमा खेडकरचा शोध पोलिसांकडून सुरू होता. पूजा खेडकरच्या बाणेर येथील बंगल्यावर जाऊन पोलिसांनी मनोरमा खेडकर असल्याची पाहणी केली होती. त्यावेळी तिने पोलिसांना दाद दिली नव्हती. नंतर घराच्या गेटवरती कुलूप लावल्याचं निर्दशनास आलं होतं. फोन देखील बंद असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांची ३ पथकं मनोरमा खेडकरचा  शोध घेत होते. महाडमधील एका हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपून बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पोलिसांचं पथक हॉटेलवरती दाखल झालं त्यानंतर मनरमा खेडकरला अटक करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *