डोंबिवली: भक्ती वेदांत हॉस्पिटल अँड रिसर्च मीरा रोड यांच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी डोळ्यांची मोफत तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शिबीर आयोजित करण्यात येते. या शिबिराचा लाभ शेकडो रुग्ण घेत असतात. गुरुवार दि १८ जुलै २०२४ रोजी विश्व अभियंत्रिकी सेवा स्वामी समर्थ मठासमोर हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. याप्रसंगी किशोर आढळकर, बिमल नाथवानी, जेष्ठ पत्रकार बापू वैद्य, सुशील सामंत, मनोज पाटील आदी उपस्थित होते. सदर शिबिराचे आयोजन किशोर आढळकर बिमल नथवानी यांनी केले.