कल्याण :-कल्याण पश्चिमेतील मौलवी कंपाउंड परिसरातील चार मजली न्यू मोलवी नावाच्या धोकादायक इमारतीच्या गॅलरीच्या मोठा भाग सकाळी अचानक कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेत एका लहान मुलगा किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने जीवित हानी टळली.
सदर इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, पोलीस ,केडीएमसी अधिकारी घटना स्थळी दाखल झालं असून इमारतीतील राहणाऱ्या 35 कुटुंबीयांची स्थलांतराची प्रक्रिया केडीएमसी कडून सुरू करण्यात आली आहे मात्र महापालिकेकडे नियोजन नसल्याने महापालिकेने स्थानिक रहिवाशांकडून दहा दिवसाचा वेळ मागितला असून तोपर्यंत आम्ही राहायच कुठे असा प्रश्न या इमारतीतील रहिवासी करत आहेत