मुंबई : माजी सहकार राज्यमंत्री आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघातून चार वेळा शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गेल्या काही वर्षांपासून पक्षात डावलले गेल्याने तसेच लोकसभा निवडणुकीतही उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे न जाणून घेता परस्पर उमेदवार जाहीर केल्यामुळे व्यथित होऊन त्यांनी उबाठा सेनेची साथ सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय नहाटा, हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव, उपजिल्हाप्रमुख राजू चापके आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!