मानखुर्द येथील  भंगाराच्या गोदामाला आग

घाटकोपर : मानखुर्द येथील मंडाळा परिसरातील भंगाराच्या गोदामाला आज अचानक सांयकाळी आग लागली.    सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नसून मात्र गोदामे पूर्णपणे खाक झाले आहेत . या परिसरात आणखी काही पत्र्याच्या झोपड्या आहेत . आगीचे कारण स्पष्ट कळले नसून येथील परिसरात तेलाचे गाळे व लाकडाचे कारखाने देखील आहेत . आगीचे डोंब प्रचंड वाढल्याने परिसरात धूरच धूर पसरला होता . घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या असून जवानांना आग विझवण्यात यश आले आहेत . मंडाळा परिसरातील हि दुसरी आग आहे असे समजते मानखुर्द पोलीस ठाण्याचे एसीपी माने या घटनेचा पुढील तपास करत आहेत .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *