मुंबई : शिक्षणाला वयाची अट नसते असे म्हटले जाते. डोंबिवलीतील छाया वाघमारे यांनी हे खरं करून दाखवलं आहे. वयाच्या ५१ व्या वर्षी छाया यांनी दहावीच्या परिक्षेत ६६.२० टक्के गुण मिळवीत यश मिळवलं आहे. 

ठाणे जिल्हयातील डोंबिवली शहरात राहणा-या छाया वाघमारे यांनी आपल्या कुटूंबाचा गाढा ओढत जिद्दीने १० वी पास होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. कमी वयात लग्न झाल्याने त्यांना १० वी पास होण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते परंतु तब्बल ३५ वर्षानंतर छाया यांनी पुन्हा मुबंई येथील व्ही. एस. एम. भायखळा नाईट हायस्कूल येथे ऍडमिशन घेतले.जिद्दीने दिवस रात्र अभ्यास केला.कोणतेही खाजगी क्लासेस न लावता शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम नियमित करत १० वीच्या परीक्षेत ६६.२० टक्के गुण मिळवले आहे. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळेच हे यश मिळाल्याचे छाया यांनी सांगितले. दरम्यान मागच्या वर्षी छाया यांनी नर्सिंग ची परीक्षा देत त्या उत्तीर्ण झाल्या यापुढेही अजून शिकायची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे छाया यांना १ मुलगा आणि १ मुलगी असा त्यांचा परिवार आहे.

—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!