आदिवासी वसतिगृहातील जेवणात अळ्या आणि किडकी फळे
कल्याण : येथील बिर्ला कॉलेज परिसरातील आदिवासी वसतिगृहातील जेवणात चक्क आळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आदिवासीबाबत असलेली सरकारची उदासीनता चव्हाट्यावर आलीय. संबंधित ठेकेदारावर कडक कारवाईची मागणी जोर धरू लागलीय. या अदिवासी वसतिगृहात 90 विद्यार्थी राहतात. वसतिगृहात मुलांना जेवण देण्याचं कंत्राट भिवंडीच्या जागृती महिला बचत गटाला देण्यात आलंय त्यांच्याकडून वस्ती गृहातील विद्यार्थ्यांना जेवण पुरवले जाते शुक्रवारी नेहमीप्रमाणे जेवण आले पण पनीरच्या भाजीत विध्यार्त्याना आळ्या आढळून आल्या तसेच फळांना किडे लागल्याचे दिसून आले. संबंधित ठेकेदाराला एका विद्यार्थ्यामागे 3200 रुपये दिले जातात मात्र तरीसुद्धा विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण पुरवले जाते हे पुन्हा एकदा सिध्द झाले असून सरकारी यंत्रणेचा याकडे कानाडोळा होत आहे. संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होत आहे.
——
Daddʏ you didn?t say what thhe best factor about God is.
Yоᥙ need to plɑ too.