कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कल्याणात जाहीर सभा आहे. मात्र सभेपूर्वीच कल्याणच्या पदाधिका-यांमध्ये मानापमान नाट्य रंगले आहे.  शिवसेना (शिंदे) कल्याण मुरबाड विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांना व्यासपीठावर निमंत्रितांच्या यादीत स्थान न मिळाल्याने त्यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. 

अरविंद मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केलीय.   आमदार, शहरप्रमुख, माजी आमदार हे व्यासपीठावर निमंत्रीत असताना शिवसेना पदाच्या प्रोटोकॉलप्रमाणे यजमान जिल्हा प्रमुखाला व्यासपीठावर उपस्थित राहण्याचा मान मिळायला हवा होता. पण जाणीवपूर्वक माझे नाव डावलले असल्याने मी माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. असे मोरे यांनी मुख्यमंत्रयांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. 

  वर्षभरपूर्वी  अरविंद मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला रामराम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.  एकनाथ शिंदे यांनी कल्याण आणि मुरबाड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी अरविंद मोरे यांच्याकडे दिली होती. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *