मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत एकला चलो रे चा नारा दिला आहे. रविवारी वंचितने दुसरी यादी जाहीर करीत ११ उमेदवारांना संधी दिली आहे यापूर्वी वंचितने पहिली यादी जाहीर करताना ८ उमेदवारांना संधी दिली होती. त्यामुळे वंचितच्या उमेदवारांची संख्या १९ झाली आहे. 

वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या यादीत  हिंगोलीतून बी. डी. चव्हाण, लातूरमधून नरसिंग उदगीकर, सोलापूरमधून राहुल गायकवाड, माढातून रमेश बारस्कर, साताऱ्यातून मारुती जानकर, धुळ्यातून अब्दुर रेहमान, हातकंगलेमधून दादासाहेब पाटील, रावेरमधून संजय ब्रह्मणे, जालनातून प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्यमधून अब्दुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग काका जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!