मौत का कुआ मध्ये घडला थरार प्रकार :  स्टंट गर्लला गाडीने चिरडले 

कल्याण : येथील दुर्गाडी किल्ल्याजवळील नवरात्र उत्सवातील मेळयात मौत का कुआचा खेळ रंगला असतानाच, कारमधील स्टंट गर्ल बाहेर फेकली जाऊन तिच्या अंगावरून कार केल्याचा थरार प्रकार घडला आहे. शिवानी गजभिये असे त्या तरूणीचे नाव आहे. या अपघातात ती गंभीर जखमी झाली असून तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मौत का कुआ चा थरार व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. स्टंट गर्ल ही कारमधून पाय बाहेर काढून बसली होती. त्याचवेळी तिचा पाय वरच्या जाळीला अटकल्याने ती गाडीतून बाहेर फेकली गेली कार तिच्या अंगावर गेल्याचेही व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

मौत का कुआ चा थरार व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *