डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीच्या कुंभारखाणपाड्यातील ललित हायस्कूलच्या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर स्थानिक चार जमीन मालक आणि इतर 10 जणांनी शाळेच्या चालकांना शिवीगाळ व धक्काबुक्की करत नियमबाह्य पध्दतीने मालकी हक्क दाखवून क्रीडांंगण जागेचा ताबा घेतला. या प्रकरणी शाळा चालकांनी दाखल केलेल्या तक्रारीची सहा महिन्यांपासून चौकशी केल्यानंतर विष्णूनगर पोलिसांनी या जागेचा बळजबरीने ताबा घेणाऱ्या आणि गुंडगिरी करणाऱ्या एकूण 14 जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली पश्चिमेत कुंभारखाणपाडा येथे माॅर्डन इंग्लिश शाळेच्या बाजुला ललित इंग्रजी, हिंदी हायस्कूल आहे. ललित हायस्कुलला जोडून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान आहे. या मैदानावरून स्थानिक विरुध्द शाळा व्यवस्थापक यांच्यात वाद होता. याप्रकरणी ललित हिंदी-इंग्रजी हायस्कूलचे सचीव राजेंद्रप्रसाद रामलखन शुक्ला (71) यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शाळेच्या क्रीडांगणाचा बेकायदा ताबा घेणारे आरोपी हरिश्चंद्र म्हात्रे, सदाशिव म्हात्रे, लालचंद्र म्हात्रे, राजू म्हात्रे आणि इतर दहा जणांच्या विरुध्द विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा गेल्या सहा महिन्यांपासून तपास सुरू होता. या प्रकरणात ललित शाळेच्या मैदानाचा ताबा घेणारे हरिश्चंद्र म्हात्रे आणि त्यांचे इतर सहकारी दोषी आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.
    

या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारखाणपाडा येथे ललित हायस्कूल आहे. या शाळेला लागून मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त क्रीडांगण आहे. या क्रीडांगणाला कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये यासाठी ललित हायस्कूलच्या व्यवस्थापनाने शाळेसह क्रीडांगणाला जोडणाऱ्या भागात लोखंडी दरवाजा लावला आहे. या क्रीडांगणाच्या जागेवरून आरोपी आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात वाद सुरू आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हरिश्चंद्र, सदाशिव, लालचंद्र, राजू या कुंभारखाणपाडा आणि नवापाडा भागात राहणाऱ्या रहिवाशांनी सोबत दहा जण घेऊन झुंडीने ललित हायस्कूलजवळ आले. त्यांनी रागाच्या भरात क्रीडांगणाला लावलेला लोखंडी दरवाजा तोडून टाकला. या कारवाईला विरोध करणाऱ्या शाळा सचिव राजेंद्रप्रसाद शुक्ला यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. शुक्ला यांना ढकलून देत आरोपींनी क्रीडांगणात घुसून बेकायदा क्रीडांगणाचा ताबा घेतला. शाळा व्यवस्थापनाने शिरकाव करू नये म्हणून क्रीडांगणाच्या सभोवती सिमेंटचे खांब टाकून त्याला हिरव्या रंगाची जाळी लावून क्रीडांगणाचा नियमबाह्यपणे ताबा घेतला. या घुसखोरी प्रकरणी शाळेने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून सहा महिन्यांनी आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

केडीएमसी आयुक्तांना भूमाफियांचे आव्हान

कुंभारखाणपाडा हा परिसर बेकायदा बांधकामांचे आगर ओळखला जातो. या भागातून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा वळण रस्ता जातो. त्यामुळे या भागातील जमिनींना वाढते भाव मिळत आहेत. स्थानिक भूमाफियांची या भागातील खासगीच नव्हे तर सरकारी जमीन हडप करण्याची वृत्ती वाढली आहे. आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड यांनी केडीएमसी हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहू दिले जाणार नाही, असे दोन महिन्यापूर्वी जाहीर केले होते. आयुक्तांना आव्हान देणाऱ्या भूमा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!