भिवंडीत बचावकार्यात अडथळे ;  एनडीआरएफच्या पथकाला पाचारण
१ ठार , 2 जखमी:  20 जण अडकल्याची भीती

भिवंडी : भिवंडीतील नवी वस्ती भागातील चार मजली इमारत कोसळून 1 ठार 3 जखमी झाले आहे. आतपर्यंत 5 जणांना ढिगाऱ्या खालून काढण्यात आले असून अजूनही 17 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जय ठिकाणी ही दुर्घटना घडली तो भाग अत्यंत चिंचोळा असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. एनडी आर एफ चे पथकाला पाचारण करण्यात आलंय. सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत या दुर्घटनेत ताहिर बिजनौरी नामक मुलीचा मृत्यू झालाय जखमींना इंदिरा गांधी इस्पितळात दाखल करण्यात आलंय. इमारत कोसळल्यानंतर पोलीस, अग्निशमन दल, नागरिकांनी घटना स्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. मात्र या ठिकाणी अत्यंत चिंचोळा मार्ग आहे त्यामुळे बचाव कार्यात खूपच अडथळा येत आहे. 10 ते 12 वर्ष जुनी इमारत असल्याचे सांगितले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!