मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  त्यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले.

  शाहू महाराजांना उमेदवारी घोषित केल्यानंतर ॲड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वंचित बहुजन आघाडी शाहू महाराज छत्रपती यांना पूर्ण पाठिंबा देणार आहे. वंचित बहुजन आघाडी फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर विश्वास ठेवते आणि या विचारधारेचे प्रमुख समर्थन करते. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांबद्दल आमच्या मनात अपार आदर आहे. त्यामुळे आम्ही हा जाहीर पाठींबा त्यांना दिल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

शाहू महाराज यांनी मानले आभार –

वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज यांना दिलेल्या पाठिंब्याचे शाहू महाराज यांनी X वर पोस्ट करत आभार मानले आहेत. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध जपले गेल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *